जि.प.उ.प्राथ.शाळा, छल्लेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचा १२४वा स्मृतिदिन साजरा.

0
35

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)

अहेरी :- आज दि.१०मार्च२०२१ ला जि.प‌.उ.प्राथ.शाळा, छल्लेवाडा केंद्र-राजाराम ता अहेरी जि.गडचिरोली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचा १२४ वा.स्मृतिदिन साजरा करण्यात आला.इ.५वी ते ८वीतील उपस्थित मुलामुलींच्या रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विविध वेषभुषा स्पर्धा घेण्यात आल्या. सावित्रीबाई फुले ह्यांच्या प्रतिमेस माला अर्पण करण्यात आली.व लगेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या.‘आम्ही सावित्रीच्या लेकी ’हा उपक्रम विविध वेषभुषा साकारत माहिती करून देण्यात आली.महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही.याची माहिती गुगल द्वारे शालेय विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. यावेळी सामा सिडाम मुख्याध्यापक,कल्पना रागिवार पदवीधर शिक्षिका, प्राथमिक शिक्षक सुरजलाल येलमुले, समय्या चौधरी,मुसली जुमडे, बाबुराव कोडापे, राजेंद्र दहिफळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरजलाल येलमुले व कल्पना रागिवार यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबुराव कोडापे यांनी केले.