अबब,जिल्हा सामान्य रुग्णालयच समस्यांच्या विळख्यात शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ यांना असोसिएशन ऑफ एन. जी. ओ. ग्रुप च्या माध्यमातून सी. एस. मॅडम यांना निवेदन निवेदन ज्या समस्या सोडविण्या करिता गेले होते त्याच समस्या ऑफिस मध्ये दिसून आल्याने सामान्यांच्या समस्या सुटेल का असा प्रश्न निर्माण झाला?

294

 

प्रतिनिधी/ रोहन आदेवार

यवतमाळ: दिनांक:२८/०७/२०२० रोजी जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ येथे असोसिएशन ऑफ एन. जी. ओ. ग्रुप च्या माध्यमातून सी. एस. मॅडम यांना यवतमाळ शहरातील प्रभाग निहाय समस्यांचे निवेदन देण्याकरीता समस्त पदाधिकारी व सदस्य यांचे उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले. परंतु सदर निवेदन हे प्रभागातील नागरिकांना दिलासा व कोरोना विषाणू मुळे रोगराई चा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना देण्याकरिता एकत्रित येऊन निवेदन देण्यात आले. परंतु आॅफीस च्या प्रमुख प्रवेशद्वारा जवळच गांजर गवत व ऑफीस च्या परिसरात अनेक ठिकाणी वापरलेले मास्क दिसुन आले तसेच ३/४ फुटाचे झाडे पावसामुळे तयार झालेले आढळुन आले व उपस्थितीत सर्वांनी विचार केला की ज्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही न्याय व मदत मागण्यासाठी गेलो परंतु त्यांच्याकडे समस्या दिसून आल्या आपल्या सर्व सामान्यांच्या समस्या सोडवतील का? असा उपस्थितीतां मध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.

या वेळी विनोद दोंदल, प्रलय टिप्रमवार,सुकांत वंजारी, विलास झेंडे, किशोर नरांजे, अरविंद बोरकर,संजय शेंडे, संजय चव्हाण,गौरव इंगळे, संकेत लांबट, ललित जैन, अमोल खडसे,रशीद अन्वर इत्यादी अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.