चिपळुणात शुक्रवारपासून आठवडाभर भाजी व फळ विक्री व्यवसाय बंद चिपळूण भाजी व्यापारी संघटनेची माहिती

0
135

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर

चिपळूण : शहर व परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण भाजी व्यापारी संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक ३१ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत भाजी व फळ विक्री बंद ठेवण्याचा निर्णय चिपळूण भाजी व्यापारी संघटनेने नुकत्याच घेतलेल्या बैठकीत घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष सुधीर शिंदे, भरत गांगण व दत्तात्रय वाळुंज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ग्रामीण भागात असलेला कोरोना चिपळूण शहरात वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे चिपळूणवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चिपळूण शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण भाजी व्यापारी संघटनेने नुकतीच तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ३१ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत चिपळूण शहर व परिसरातील भाजी व फळ विक्री बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भाजी व्यापारी व संघटनेचे राजेंद्र कांबळे, प्रकाश शिंदे, श्रीरंग माजलेकर, मारुती करंजकर, दीपक रजपूत, मेहबूब तांबे, एकनाथ भालेकर, प्रभू स्वामी, शिवाजी पिसे, विष्णू आखाडे, सुरेश आखाडे, मुस्तकीन बागवान, विजय माळी, जावेद मुलानी, उज्वल शिंदे, संदीप भालेकर, विजय बिरवटकर, अनंत दाभोळकर, सुनील निवाते, शंकर कांगणे, गणेश खंडजोडे, वासुदेव भालेकर, संदीप बंगाल, संतोष भालेकर आदी उपस्थित होते. गेल्यावेळीदेखील भाजी व्यापाऱ्यांनी बंद ठेवला होता. यावेळीदेखील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन चिपळूण भाजी व्यापारी संघटनेने भाजी व फळ विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी दिली.
*दखल न्यूज भारत*