विश्व वारकरी सेना इंदापूर तालुका अध्यक्षपदी ह-भ-प श्री राम महाराज अभंग वडापुरी व तसेच आबासाहेब उगलमुगले यांचीही सहा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. : पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सुतार परिवाराच्या वतीने माजी सरपंच हरिभाऊ बाबुराव सुतार व आप्पासाहेब सुतार, संतोष सुतार, यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन दोघांचाही सन्मान करण्यात आला

269

 

नीरा नरसिंहपूर दिनांक 28 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

ह भ प श्रीराम महाराज व पत्रकार आबासाहेब उगलमोगले

यांची निवड झाल्याबद्दल सुतार परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न झाला. वडापुरी येथील ह-भ-प श्री राम महाराज अभंग यांची नुकतीच इंदापूर तालुका विश्व वारकरी सेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या हस्ते  निवडीचे पत्र दिले तसेच लाखेवाडी येथील पत्रकार आबासाहेब उगलमुगले यांची सह अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी बुद्रुक येथे समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ सुतार परिवार यांचे वतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला. श्रीराम महाराज अभंग सत्कार प्रसंगी म्हणाले की वारकऱ्यांच्या व तळागाळातील सर्वसामान्याच्या जनतेच्या व वारकऱ्यांच्या कार्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आडी आडचणी सोडवण्याचा प्रयत्न करूया . या प्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच हरिभाऊ सुतार यांनी केले  तर उपस्थित विणेकरी महादेव सुतार, संदिपान पडळकर ,शरद बोडके  भागवत सुतार, चंद्रकांत सुतार  पोपट सुतार बाळासाहेब घाडगे ,आप्पासाहेब सुतार ,धनंजय भोसले  व भजनी मंडळ उपस्थित होते सूत्रसंचालन महेश सुतार यांनी केले तर आभार हनुमंत सुतार यांनी मानले.

————————————————–

फोटो:-ओळी- ह भ प श्रीराम अभंग महाराज व  ह भ प आबासाहेब उगलमुगले यांचा सन्मान करीत असताना सुतार परिवार.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160