रत्नागिरीत कोरोनामुक्त रुग्णाचे पुष्पवृष्टीने स्वागत

0
79

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी:कोरोनावर मात करणारा रुग्ण घरी येताना सोसायटी परिसरात त्याच्यावर पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत करण्याचा आगळावेगळा व स्तुत्य उपक्रम उपक्रम आज रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात राबवण्यात आला. स्थानिक रहिवाशांनी या रुग्णाचे स्वागत करत ‘कोरोनाला घाबरू नका, तर त्यावर मात करता येते’ असा सकारात्मक संदेश समाजाला दिला. एका रुग्णाचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळणार असल्याने स्थानिक रहिवाशांनी या रुग्णाचे आनंदाने स्वागत करण्याचे ठरवले. दुपारी त्यांचे जोरदार स्वागत पुष्पवृष्टी व औक्षण करून आणि टाळ्या वाजवून करण्यात आले. या उपक्रमात रुग्णाच्या घरातील मंडळी, नातेवाईक, डॉ. श्रीनिवास कुंभारे, डॉ. अभय धुळप, मेधा कुळकर्णी, शिल्पा मराठे, पमू पाटील, ऋतूजा कुळकर्णी, नगरसेवक उमेश कुळकर्णी, परिसरातील मंडळी उमाकांत सनगर, राजू केणी, किशोर मालगुंडकर, केतन सनगर, मंजुषा बूंधाळे, जर्नादन पुनसकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी डॉ. कुंभारे यांनी सांगितले की, कोरोना बरा होतो घाबरून जाऊ नये, वेळीच वैद्यकीय उपचार घेऊन यावर मात करता येते.

*दखल न्यूज भारत*