जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली अहेरी येथील विश्रामगृहाची पाहणी – दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणार

108

 

प्रतिनिधी / रमेश बामनकर

गुड्डीगुडम : शासकीय अधिकारी, पदाधिकारी यांच्या दौऱ्यादरम्यान मुक्कामी राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयी विश्रामगृहांचे बांधकाम करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणच्या विश्रामगृहांची दुरावस्था झाली आहे. अहेरी येथील जि.प.च्या विश्रामगृहाची नुकतीच जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली.
पाहणीदरम्यान सबंधित अधिकाऱ्यांना सुचना देवून निधी उपलब्ध होताच दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्याचे आदेश दिले. तसेच देखभाल करून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या . विश्रामगृहाच्या बांधकामाला बरेच वर्ष झाले असल्यामुळे काही प्रमाणात दुरूस्ती आवश्यक आहे. या पाहणीदरम्यान अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते