वेकोलिच्या सेवा निवृत्त कामगारांची गळफास लावून आत्महत्या

713

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस येथील बहिरमबाबा नगर वॉर्ड न 6 येथील वेकोलिचे सेवानिवृत्त कामगार किस्तया नीचकोला वय वर्षे 72 यांनी दी 28 जुलै ला सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान स्वतःच्या राहते घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्यचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले व एक मुलगी असा मोठा परिवार आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पंचनामा करुन पुढील कार्यवाही सुरु आहे. पुढील तपास घुग्घुस चे ठाणेदार राहुल गांगुर्डे करीत आहेत.