विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती त्यांच्या शिष्यवृत्ती खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावी वंचित बहुजन आघाडी चे दिपक जनबंधु यांची मागणी

 

बिंबिसार शहारे(९५४५७७६३७८)
प्रतिनिधी दखल न्युज भारत

भंडारा,दि.२८/०७/२०२० :
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शिष्यवृत्ती ची तरतूद केलेली असते. पण अलीकडे जिल्ह्यात तसेच राज्यात अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप ही त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. ह्याचं मूळ कारण काय व त्यांना ह्या शैक्षणिक अधिकारापासून वंचित न ठेवता लवकरात लवकर योग्य ती जाचपळतानी करून विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती ची रक्कम जमा करण्यात यावी , ह्या मागणीसाठी समाज कल्याण आयुक्तांना निवेदन देऊन त्यांच्याशी विषयावर सकारात्मक चर्चा झाली. ह्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा संघटक दिपक जनबंधु ह्यांनी शिष्यवृत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्ण प्रक्रिये बद्दल माहिती घेतली व आयुक्तांशी पुढील प्रक्रिया तातडीने करण्याची विनंती केली.
राज्यभरामध्ये अनेक SC,ST,OBC तसेच इतर लाभार्थी प्रवर्गातील विद्यार्थी हे शिष्यवृत्ती ची वाट बघत असून , ही शिष्यवृत्ती त्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यात उपयोगी ठरत असते.
अलीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन च्या परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांनवर अशे बरेच संकट समोर आलेले आहेत. शिक्षण हे सर्वांचे मूलभूत हक्क अधिकार आहे पण शिक्षण घेत असतांना विद्यार्थी अनेक प्रश्नांचा सामना करीत असतो. इथला विद्यार्थी व त्यांचं पालक वर्ग हा सामाजिक न्याय विभागाकडे आशेने बघत असतो की त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील.
परत ही परिस्थिती फक्त जिल्ह्यात च नसून राज्यातील अनेक भागात पहायला मिळत आहे , त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून ह्या प्रश्नाला लवकरात लवकर मार्गी लावावे असे निवेदनात नमूद होते.
ह्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा संघटक दिपक जनबंधु , सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्याम भालेराव, वंचित चे प्र.प्रमुख अतुल नागदेवे, ता.लाखनी युवा आघाडी सहसचिव सचिन रामटेके, सार्वभौम युवा मंच चे प्रांजल लांडगे, सम्यक चे परवेश मेश्राम, निखिल शेंडे, किशोर मस्के व वंचित चे भंडारा शहर सदस्य शुभम नंदेश्वर उपस्थित होते.