दर्यापूर तहसिल कार्यालयात सोशल डिस्टटिंगचा फज्जा प्रशासन मात्र झोपेत

239

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तहसिल कार्यालयात आवक जावक विभागाच्या खिडकीसमोर सोशल डिस्टटिंगचा फज्जा उडत असून याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष नाही
दर्यापूर तहसिल कार्यालयात दररोज तालुक्यातील नागरिक विविध कामासाठी येतात शासकीय कामाच्या वेळेत तहसिल कार्यालयात नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता अधिकारी वर्गानी कामकाजासाठी असलेल्या खिडक्या वाढवून द्याव्यात अशी विनंतीवजा मागणी ऍड संतोष कोल्हे यांनी केली आहे