वणीतील प्रभू श्रीराम नवमी उत्सव समितीच्या युवकांनी शरद पवारांना पाठविले पत्र

107

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केलेल्या राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही. या आक्षेपार्ह विधानानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर वणी शहरातील प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती ,वणी तर्फे रस्त्यावर उतरून निषेध केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांना “जय श्रीराम” लिहिलेली तब्बल 1 हजार पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने वणी शहरात श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या विनंती नुसार प्रभू श्रीराम नवमी उत्सव समितीचे सदस्य नितेश मदिकुंटावार यांच्या नेतृत्वात जय श्री राम लिहिलेले पोस्ट कार्ड शरदचंद्र पवार यांना पाठविले.

या वेळेस शिवम सिंग ,सचिन तावडे,संतोष ठेंगणे,सतीश बंदूरकर,निशांत सिंग, शरद केळकर,महेश मुळे, सदस्य गण उपस्थित होते.