रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

0
233

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

गोंदिया : जिल्हयातील गोंगली हिरडामली रेल्वेस्थानाकानजीक बल्लारशाकडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या धडकेत वाघाच्या बछडयाचा मृत्यू झाल्याची घटना आज ८ मार्च २०२१ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. सदर मृत बछडा टी – १४ वाघीणीच्या तीन बछडयांपैकी एक असल्याचे बोलल्या जात असून सदर घटनेची माहिती वनविभागला देण्यात आली.
नागझिरा पुर्व भागामधून गोंदिया चंद्रपूर ही रेल्वे लाईन जाते. अभयारण्याच्या लगत असल्याने अनेक वन्यजीव या क्षेत्राम मोठया प्रमाणात वावरतात. दरम्यान वाघिणीचे तिन बछडे आणि वाघिन रेल्वे रूळ ओलांडत असतांना एका बछडयाला रेल्वेची धडक बसली यात बछडयाचा मृत्यू झाला. वन विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.