वडापुरी येथील शॉर्टसर्किटमुळे मृत्युमुखी पडलेल्या गायीच्या गोट्याची राजवर्धन पाटील यांनी केली पाहणी.

0
47

 

निरा नरसिंहपूर दि- 8 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार

वडापुरी अवसरी रोडवरील हनुमानवाडी येथील गोविंद बाळासाहेब निंबाळकर यांच्या गाईच्या गोठ्याला इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे ६ जनावरांचा होरपळून मृत्यु झाला आहे तसेच ३ म्हशी ६५% टक्के भाजलेल्या असून, गोठ्यात असणारी कोंबड्याची एक जाळीही आगीत भस्म झाली आहे. सदर घटना समजताच या घटनेची पाहणी नीरा-भीमा सहकारी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केली तसेच निंबाळकर परिवाराला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राजवर्धन पाटील म्हणाले की,’ निंबाळकर परिवार शेती व्यवसायाबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत होते. शॉर्टसर्किट झाल्याने जनावरे मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिवाराला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160