३ जुलैच्या येलदडमी जंगल परिसरात पोलीस- नक्षल चकमकीत कमांडर सोमा शंकरसह डेप्युटी कमांडर अमोल होयामी ठार … शासनाने ६ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षल अभियान पथक सी-६० कमांडोचे अभिनंदन व कौतुक केलेत

0
146

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : ३ जुलै २०२० रोजी हेडरी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या येलदडमी जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक झाली होती. दरम्यान या चकमकीत पेरमिली दलम कमांडर सोमा उर्फ शंकर हा ठार झाला तर याच चकमकीत पुन्हा दोन नक्षल ठार झाले असल्याची शंका वर्तविण्यात येत होती. दरम्यान येलदडमी येथे झालेल्या चकमकीत गट्टा दलम चा डेप्युटी कमांडर अमोल होयामी हा सुद्धा ठार झाला असल्याचे नक्षलांच्याच एका पत्रकातून माहिती मिळाली आहे. नक्षल अमोल होयामी वय २१ वर्ष हा छत्तीसगड राज्यातील भैरामगड जिल्हा बिजापूर येथील राहवासी होता तो वर्ष २०१७ मध्ये भामरागड दलममध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तो गट्टा दलम च्या डेप्युटी कमांडरपदी कार्यरत होता. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये तीन गंभीर गुन्हे दाखल होते. याच्यावर शासनाकडून ६ लाखाचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले होते. तसेच पेरमिली दलम कमांडर सोमा उर्फ शंकर आणि गट्टा दलम डेप्युटी कमांडर अमोल होयामी येलदडमी येथील पोलीस-नक्षल चकमकीत या जहाल नक्षलांना ठार करणाऱ्या पोलीस जवानांचे गडचिरोली पोलीस अधिकक्षक शैलेश बालकवडे यांनी अभिनंदन केले आहे.