कोराडी महाजेनको तंत्रज्ञ – ३ यांची पत्नी कोरोना पाँजिटीव

2372

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक,
दखल न्युज भारत नागपुर

कोराडी / नागपुर: २८ जुलै २०२०
कोराडी महाजेनको नविन पाँवर प्लांट ३×६६० मेगावॉट प्रकल्पातील संचालन, युनिट ८ मधील टेक्निशियन – ३ यांची ३० वर्षिय पत्नी आज कोरोना पाँजिटीव आढळली आहे.
प्राप्त माहितीनुसार ही ३० वर्षिय महिला आपल्या ३ वर्षिय मुलीला घेऊन चंद्रपुर हुन २६ जुलै रोजी कोराडी काँलनी येथे पोहचली होती. परंतु मुख्य अभियंता राजेश पाटील यांचे सुरक्षा कर्मचारी यांना स्पष्ट निर्देश होते की, कोणीही व्यक्ती बाहेरुन आले तर त्यांना बाहेरच चेमरी गेस्ट हाउस ला होम कोरोंटाईन करावे. त्यानुसार सुरक्षा कर्मचारी यांनी या महिलेला तिच्या मुलीसोबत चेमरी गेस्ट हाउस ला होम कोरोंटाईन केले होते. त्या महिलेची दुसऱ्या दिवशी टेस्ट केली. तिचा रिपोर्ट आज पाँजिटीव आला आहे.
गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी दखल न्युज भारत पोर्टल चैनल शी बोलताना सांगितले की, उद्या आम्ही VNIT भरती करणार आहेत तसेच त्या महिलेच्या मुलीची उद्या स्वैब टेस्ट करणार आहेत..