गणेशपूर येथील रास्त भाव दुकानदाराचा मनमानी कारभार, ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

0
450

 

वणी : परशुराम पोटे

शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील रास्त भाव दुकानदाराने लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप केली नसल्याची तक्रार करीत लाभार्थ्यांना अत्यल्प धान्य वाटप करण्यात येत असल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी येथील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील गणेशपूर येथील रास्त भाव दुकान स्थानिक सखी महिला बचत गटाला दिले आहे. सदर दुकान बचत गटातील महिला चालवीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एप्रिल महिन्यात मोफत डाळ वाटप रास्त भाव दुकानातून केली आहे. परंतु गणेशपूर येथील रास्त भाव दुकानदाराने गेल्या चार महिन्यापासून कोणालाही डाळ वाटप केली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. सोबतच अंत्योदय लाभार्थ्यांना ३५ किलो धान्य देण्यात न येता पाच किलो धान्य कमी दिले आहे. सदर रास्त भाव दुकान चालविणाऱ्यानी यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचा ठपका ठेवत दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गणेशपूर येथील भगवान मोहिते, जयश्री कुघाटे, छाया घुगुल,सुनीता मोहिते,जनाबाई जाधव,शोभा जोगी,पुष्पां काकडे,मीनाक्षी मोहिते सह अनेक महिलांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.