….अन घोरपडीस मिळाले जीवनदान

170

कुरखेडा/राकेश चव्हान प्र
रानावनात वास्तव्य असलेले दोन फूट लांबीचे घोरपड आज मंगळवारी शहरातील एका दुकानात शिरले या घोरपडीला येथील वनकर्मचाऱ्यांनी मोठया शिताफीने पकडून जीवनदान देत तिला जंगलात सोडण्यात आले नगरातील हनुमान मंदिर मार्गावर असलेल्या जुन्या साई मेडिकल दुकानात घोरपड शिरतांना काही नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी ही बाब येथील वनपाल शिवशंकर कायते यांना कळविण्यात आले वनपाल कायते यांनी घटनास्थळी भेट देत वनकर्मचाऱ्यांना पाचारण केले वनकर्मचारी सुरेश मडावी यांनी मोठया शिताफीने दोन फूट लांब असलेली घोरपड पकडली घोरपड पकडल्याचे समजताच बघ्यांनी तोबा गर्दी केली होती वनपरिक्षेत्रअधिकारी सुनील सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली घोरपड जंगलात सोडण्यात आले