महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे नागपुर अध्यक्ष सुनील साळवे यांनी जबाबदारी स्वीकारली नागपुरातील प्रिंट मीडिया, पोर्टल व यु ट्युब चैनल शी निगडित पत्रकारांनी पुरोगामी पत्रकार संघाची सदस्यता घेण्याचे सुनील साळवे यांचे आवाहन

0
290

 

आशिष थुल
शहर प्रतिनिधी, नागपुर

नागपुर : २८ जुलै २०२०
महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपुर जिल्हा अध्यक्ष पदी दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांची निवड होताच त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून नागपूर जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणी चा लवकरच विस्तार करणार अशी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाशी प्रिंट मीडिया, पोर्टल व यु ट्युब चैनल शी निगडित कोणत्याही पत्रकारांना जुळता येईल. त्यासाठी नागपुर शहर व जिल्ह्य़ातील सर्व पत्रकार बंधु आणि भगिनी यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांक ९६३७६६१३७८ या नंबर वर संपर्क करुन पुरोगामी पत्रकार संघाची सदस्यता स्विकारावी असे आवाहन सुनील साळवे (अध्यक्ष- पुरोगामी पत्रकार संघ, नागपुर जिल्हा) यांनी मीडिया तुन केले आहे. पुरोगामी पत्रकार संघ हे महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत व प्रतिष्ठित पत्रकारांची संघटना असलेले शासनमान्य संघटन असुन जमिनीस्तरावर जुळलेल्या व कार्यरत पत्रकारांच्या समस्या, मागण्या, तसेच पत्रकार संरक्षण, मानधन आदी विषयांवर पुरोगामी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी सर शासनाशी चर्चेच्या माध्यमातून सोडवत आहे. त्यामुळे पुरोगामी पत्रकार संघाशी जास्तीत जास्त पत्रकारांनी जुळावे असे आवाहन सुनील साळवे यांनी केले आहे.