Home महाराष्ट्र 15 वर्षापासून ढोलडोंगरी येथील सब सेंटर मंजुर असुन सुध्दा धूळखात कोटरा ,...

15 वर्षापासून ढोलडोंगरी येथील सब सेंटर मंजुर असुन सुध्दा धूळखात कोटरा , बेतकाठी, कोरची, फिटर विघुत लाईन नेहमी खंडित ?

162

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
कोरची दि 28 जुलै मुख्यालयापासुन 1 कि.मी अंतरावर कोटरा फिटर विघुत लाईन सायंकाळी 7 ते 8 वाजता खंडित होतो. कोरची तालुक्यात कोटरा, बेतकाठी, कोटगुल, , कोरची फिटर कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.एकाफिटर मध्ये 25 ते 30 गावे येतात वारंवार निवेदन देऊन ही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात त्यामुळे नियमित वीजपुरवठा ची समस्या सुटत नाही. त्यामुळे महावितरण कंपनी विरोधात 14 जुलै2020 ला कोरची कुरखेडा मार्गावर बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुक्यात वीज ग्राहक तहसीलदार यांना निवेदन दिले होते.या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आंदोलन विद्युत ग्राहक यांची तहसील कोरची यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वय बैठकीत कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी 15 दिवसात समस्या सोडविण्याचे लिखित आश्वासन दिले. कुरखेडा कोरची येणारे विद्युतपुरवठा खूप मोठ्या जंगलातून येत असल्याने ब्रेक डाऊन करण्यासाठी अडचण निर्माण होतात. त्यामुळे ही विद्युत जोडणी कुरखेडा कोरची रस्त्याच्याकडेला करण्यात यावी. कुरखेडा कोरची विद्युत जोडणी रस्त्याच्याकडेला स्विफ्ट करेपर्यंत देवरी वरून विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवून घेण्यात यावा. कोरची हे तालुका मुख्यालयात असल्याने सर्वच विभागांची कार्यालये येथे आहेत त्यामुळे कोरची व तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय फिटर वेगळा करण्यात यावा. कोरची येथील सब सेंटर ला 3.15 चा ट्रांसफार्मर लावलेला आहे. तोही रिपेरिंग केलेला आहे .इथे तर पाच पाच पॉईंट चा दोन दोन ट्रान्सफर लावणे गरजेचे आहे 3.15 चा ट्रांसफार्मर असल्यामुळे होल्टेज खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे.पाच चे ट्रांसफार्मर ताबडतोब लावण्यात यावे बेतकाठी गावात पंपाने शेती खूप जास्त प्रमाणात केली जाते. बेतकाठी गावात दोन ट्रान्सपोर्ट आहे. त्यात एक शंभरचा व दुसरा 25 चा आहे .100 च्या ट्रांसफार्मरवर 75% गाव चालतो व 25 ट्रान्सफॉर्मर 25 टक्के गाव व एनी पंप चालतात 25 ट्रांसफार्मर हा वर्षातुन दोन ते तीनदा जळून जातो .त्यामुळे एनी पंपासाठी सेपरेट ट्रांसफार्मर लावणे गरज आहे . ह्या संपूर्ण समस्येकडे लक्ष देऊन पाचवी प्रश्न व ढोलढोंगरी गावात 33 k.v.सबसेटर सुरू करण्यात यावे. कोटगुल भागात वीज पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून या संदर्भात चर्चा केली त्यामूळे महावितरण कंपनीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले आहे.15 दिवसांमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते .परंतु लागलेच नाही त्या वेळी तहसीलदार सी.आर.भंडारी ,कार्यकारी अधिकारी विजय मेश्राम ,पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी सहाय्यक अभियंता प्रफुल कुरसुंगे, माजी नगराध्यक्ष नसरुदी भामानी सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमंतभाऊ मानकर, सभापती श्रावण मातला, सरपंच संघटना उपाध्यक्ष राजेश नैताम, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सदृरूद्दिन भामानी, आनंद चौबे, घनश्याम अग्रवाल ,प्रा देवरावजी गजभिये, हकिमभाई शेख ,वासिम शेख, सरपंच केरामी, सरपंच हाश्मी, सरपंच गिरजाबाई कोरेटी परमेश्वर लोंहबरे , राहुल अंबादे आदी उपस्थित होते कोरची येथील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्युत लाईन संदर्भामध्ये मोर्चा काढण्याची गरज आहे त्यामुळे सर्व भाजप, काँग्रेस, शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व आर पी आय ,या संपूर्ण राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरची तालुका विकास संदर्भामध्ये एकत्र येऊन मोर्चा काढून समस्या मार्गी लावण्याचे अत्यंत गरज आहे. मंजूर असलेले ढोलडोंगरी येथील सब सेंटर सुरू करण्यात यावे. दहा वर्षापूर्वी कोरची येथील सरपंच संघटनेने सर्वपक्षीय राजीनामा दिला होता. त्यावेळेस पालक मंत्री आर. आर. पाटील ढोलडोंगरी येथील सब सेंटर व येथील समस्या तात्काळ लावण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन हवेत विरले त्यामुळे पुन्हा येथील राजकीय पक्षांनी संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी राजीनामा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तात्काळ प्रलंबित असलेल्या समस्या तात्काळ सोडून द्यावा अन्यथा संयुक्त राजीनामा देण्यात यावा अशी मागणी जनतेने केली आहे.

Previous articleट्रक व चारचाकी च्या भीषण अपघातात प्राध्यापकाचे अपघाती निधन
Next articleमहाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे नागपुर अध्यक्ष सुनील साळवे यांनी जबाबदारी स्वीकारली नागपुरातील प्रिंट मीडिया, पोर्टल व यु ट्युब चैनल शी निगडित पत्रकारांनी पुरोगामी पत्रकार संघाची सदस्यता घेण्याचे सुनील साळवे यांचे आवाहन