विधवा महिलांना अन्नधान्य मास्क सॅनिटायझर यांचे वाटप

125

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूप विधानसभेचे आमदार रमेश गजानन कोरगावकर यांच्या वतीने विभागातील विधवा घरकामं करणाऱ्या महिलांना तांदूळ,तेल,गव्हाचे पीठ,साबण,मीठ,तूरडाळ आणि सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले..
सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्या कारणाने विधवा घरकामं करणाऱ्या महिलांना मदतीचा हात देण्यात आला. लॉकडाऊन मुळे त्यांच्या हाताला काम नाही अश्या संकटात आपण जायचे कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवला आहे त्यांची परिस्थिती अगदी हलाखीची आहे