असंघटित कामगार कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद बागेसर

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली दि28जुलै-
असंघटित कामगार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद बागेसर यांची नियुक्ती,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या मान्यतेवरून जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार गडचिरोली यांच्या हस्ते मिलिंद बागेसर यांना असंघटित कामगार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती पत्र देण्यात आले.
असंघटित कामगारांना न्याय,हक्क व संघटन मजबूत करून कांग्रेस पक्ष वाढीकरिता कार्य करणार असे यावेळी बागेसर बोलले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.