दर्यापूरात मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम, युवासेनेचा उपक्रम

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
कोरोनाच्या संकटकाळात राज्याचे सक्षम नेतृत्व करणारे, शिवसेना पक्षप्रमुख,कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेना द्वारा प्रणित असलेल्या युवासेनेच्या वतीने दर्यापूर तालुका शहर व ग्रामिणच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट निलेश मोहोड यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपतालुका प्रमुख प्रतिक राऊत, प्रतिक लाजूरकर यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर तालुक्यातील विविध ठिकाणी युवासेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले तसेच बालगृहातील अनाथ आश्रमातील मुलांना जेवण देण्यात आले कोरोनाच्या संकट काळातही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमाला राहुल भुंबर, गजु खेडकर, नितीन खरड व इतर पदाधिकारी उपस्थित होते