आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या भिषणतेची चौकशी करा :- इ. झेड. खोब्रागडे

0
96

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
गडचिरोली :- दि. ३/३/२०२१
विरोधी पक्षनेते यांनी कोविड-19 मधील आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराची भीषणता, बरेच उदाहरणे देऊन विधिमंडळ अधिवेशनात दि. 2 मार्च 2021 ला मांडली. यात तथ्य असावे असे प्रथम दर्शनी वाटते. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निरपेक्ष चौकशी करण्याची मागणी इ. झेड. खोब्रागडे यांनी केली आहे. 26 नोव्हेंबर 2015 ला नागपूर च्या यशवंत स्टेडियम मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. तीन- चार तासाच्या कार्यक्रमावर शासनाने 1कोटी.88 लाख रुपयांचा खर्च झाला असल्याचे सांगितले जात आहे. संविधान दिवस साजरा करण्यात ही काही अनावश्यक खर्च आणि त्यात भ्रष्टाचार होत असेल तर ? तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांवर वारेमाप खर्च झाला. अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला अशी तक्रार 2016 मध्ये सचिव सामाजिक न्याय आणि मुख्यसचिव यांचेकडे इ. झेड. खोब्रागडे यांनी केली होती. मुख्यसचिव यांचे निर्देशानुसार ,सचिव सामाजिक न्याय यांनी आयुक्त समाज कल्याण यांना चौकशी करायला सांगीतले. या संबंधी वारंवार व्यवहार करून माहिती दिली. तसेच RTI अर्जही केला होता.परंतू झोपेचे सोंग घेऊन काम करणाऱ्यांमुळे 2016 पासून चौकशीचे काय झाले हे अजूनही समजले नाही. बार्टी ,समता प्रतिष्ठान च्या कारभाराची चौकशी हा ही मुद्धा अनेकदा मांडण्यात आला होता..डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार करणे योग्य नाही. असे आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणीही इ. झेड खोब्रागडे यांनी केली आहे.
आपण केलेल्या आरोपात तथ्य असूनही चौकशी होत नसेल ,कार्यवाही होत नसेल तर काय उपयोग? दि. 15 मार्च 2020 च्या मा.मुख्यमंत्री यांचेकडील बैठकीत केलेल्या सादरीकरणात हा मुद्धा / विषय मांडला होता. एक वर्ष होत आले तरीही काही च झाले नाही त्याबाबतची दि 20 .02.2021ची पोस्ट “आमची अपेक्षा…अधिवेशनात सरकारने निर्णय घ्यावा ” अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे.” भ्रष्टाचार आणि जातीयवाद ” च्या वृत्तीमुळे शासन प्रशासन ची सामाजिक न्यायाची चौकट खिळखिळी झाली आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. संविधानाची नीतिमूल्ये रुजविण्याची जबाबदारी सरकारची आहे, प्रशासनाची आहे, सनदी अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे जनतेला शासनाने न्याय द्यावा. अशी मागणी इ.झेड खोब्रागडे (भा. प्र. से.) यांनी केली आहे.