नाबार्ड , सारडा च्या वतीने कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

0
36

हर्ष साखरे विभागीय प्रतिनीधी
गडचिरोली :- २/३/२०२१
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक, नाबार्ड अंतर्गत तथा सोशल एक्शन फार रुरल डेव्हलोपमेंट (सारडा) संस्था आरमोरी च्या वतीने क्षेत्र समन्वयक सांबशिव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाला लागवड व बिज उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम दि. १/३/२०२१ पासून तिन दिवस कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली येथे पार पडला.कृषी तंत्रज्ञान विषयक अभ्यास कार्यक्रम घेऊन कृषी विषयक विविध विषयांवर उपस्थित मान्य
वरांनी मार्गदर्शन केले. या अभ्यास कार्यक्रमात पालोरा., पळसगांव आरमोरी येथील बहुसंख्य शेतकरी महिलांचा सहभाग होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नाबार्ड चे जिल्हा समन्वयक मा. राजेंद्र चौधरी, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र समन्वयक मा. संदीप कऱ्हाडे यांच्या उपस्थितीत पार पडला.उपस्थित महिलांना विविध प्रकारच्या भाजीपाला लागवड खते,बियाने, लागवड प्रक्रिया, शेती चे फायदे, बिज प्रक्रिया बाजारपेठ, या सारख्या अनेक मार्गदर्शन करण्यात आले. शेती तंत्रज्ञानाचा वापर करून स्वावलंबी व्हावे हा संदेशही प्रशिक्षण कार्यक्रमातून देण्यात आला. कृषी तंत्रज्ञान विषयक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी केली.