नदी किनारा वाहून गेल्याने पाण्याच्या टाकीला निर्माण झाला धोका. कुंरंडी माल आश्रम शाळेची पाणी योजना

156

 

अश्विन बोदेले
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

कुरंडी : कुरंडी माल येथील पोस्ट बेसिक आश्रम शाळेसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण होण्यासाठी नदीवर पाणी टाकी बांधण्यात आली आहे . परंतु नदीचा किनारा खचत असल्याने पाण्याच्या टाकीला धोका निर्माण झालेला आहे. कुरंडी माल येथील आश्रम शाळेत शिकणारे विद्यार्थी, निवासी असलेल्या शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आदिवासी विकास विभागाने नाडवाही नदीवर पाणी टाकी बांधून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना निर्माण केली.
मागच्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या किनाऱ्या वरील बराचसा भाग खचला आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या पाणी टाकीच्या सभोवतालची माती निघून गेल्याने पाण्याच्या टाकीला धोका निर्माण झालेला आहे.
मातीचे वाहने असेच सुरू राहिल्यास पाण्याची टाकी पूर्णपणे मोकळी पडून ती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही . त्यामुळे विहिरी सभोवताल संरक्षण भिंत बांधण्याचे उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. संरक्षण भिंत न बांधल्यास पाणी टाकी कोसळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लाख रुपयांचा भुर्दंड बसेल. व आश्रम शाळेतील पाण्याची समस्या निर्माण होईल. परिणामी पाण्याची टंचाई भासल्यास शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागेल. या गंभीर बाबीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खचलेल्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय म्हणून असलेल्या विहिरीच्या सभोवताल संरक्षण भिंत बांधण्याचे करावे. अशी गावातील नागरिकांची व शाळेतील विद्यार्थ्यांची मागणी होत आहे.