गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
283

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

ठाणे : गावदेवी क्रिकेट संघ फरारे यांच्या अथक प्रयत्नाने दि.२८ फेब्रुवारी २०२१ रोजी कळवा पठणी मैदान येथे आयोजित भव्य दिव्य गावदेवी चषक २०२१या चषकाचे आयोजन करण्यात आले होते. गावदेवीच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला कोरोणा च्या पार्श्वभूमीवर कोणतेही गालबोट न लागता पार पडले.या कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक सन्माननीय श्री आर.पी.जाधव, सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा, संपर्क प्रमुख- समाजसेवक-राजेंद्रजी भुवड, कुणबी समाज विकास संघ १८ गाव ऊन्हवरे विभाग संलग्न कुणबी युवा कुणबी युवा चे अध्यक्ष श्री विशालजी मोरे, जिगरजी पाटील, महेंद्रजी बारे,संतोषजी शिगवण, आणि श्री मनिषजी लोंढे, यांची उपस्थिती लाभली.फरारे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री तुकारामजी मोगरे,सरचिटणीस श्री सुरेशजी भागणे,सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच आणि गावदेवी चे सर्व खेळाडू व क्रिकेटप्रेमि या सर्वाची उपस्थिती वंदनीय ठरली.
विशेष म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला तो गावदेवीच्या आशीर्वादाने आणि श्री प्रकाशजी गुरव , सुनिलजी गणेश मोगरे ,श्री संतोषजी जाधव , श्री नथुरामजी पारदले , श्री सुनिल गजानन मोगरे आणि श्री अनिलजी मोगरे, गावदेवी क्रिकेट संघ फरारे -अ कर्णधार संकेत मोगरे, उपकर्णधार उमेश गुरव गावदेवी क्रिकेट संघ फरारे-ब कर्णधार संतोष जाधव उपकर्णधार सुनिल मोगरे आणि प्रशिक्षक किशन गुरव गावातील सर्व सभासद क्रिकेट प्रेमि यांचे मोलाचे सहकार्य लाभले तरी आम्हाला आमच्या दाणशुर देणगीदारांनी बहुमूल्य देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले त्यामध्ये कुणबी समाज विकास संघ दापोली तालुका मुंबई अध्यक्ष श्री दशरथजी पाटील, सुधाकरजी मिसाल,श्री महादेवजी मोगरे,श्री सुर्यकांतजी गुरव, यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांचे सुद्धा आम्ही शत:शा ॠणी आहोत.
या स्पर्धेत २४ संघानी भाग घेतला होता २४ संघाचा सांघिक खेळ पहायला मिळाला. विजेता संघ ब्लुस्टार तुंबाड आणि उपविजेता नवयुग क्रिकेट संघ पांगारी हे या स्पर्धेचे खरे मानकरी ठरले. सह्याद्रीचा रोहित जाधव मालिकावीर , उत्कृष्ट फलंदाज सचिन घडशी उत्कृष्ट गोलंदाज प्रेम याने बाजी मारली शेवटी गावदेवीच्या जय घोषणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सन्मा.प्रकाशजी गुरव यांनी छान सुंदर केले..

*दखल न्यूज भारत*