आम आदमी पार्टी चा तहसिलदार कार्यालय वर मोर्चा

0
198

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,
जिल्ह्यामध्ये नेहमी चर्चेत राहणारे घुग्घुस मागील चार दिवस पासून नायब तहसिलदार द्वारा अमराई वार्ड मध्ये दिल्या गेलेल्या नोटिस मुळे चर्चे चे कारण बनला आहे. या विषया वर आम आदमी पार्टी द्वारा तहसिल कार्यालय चंद्रपुर मधे तहसीलदार निलेश गौंड समोर प्रश्न निर्माण केला व गहन चिंता व्यक्त केली.
चंद्रपुर जिल्हा मधे 15 तालुके आहेत .या 15 तालुक्या मधे चंद्रपुर तालुका रोजच काही कारण वर्ष चर्चेत असते. जिथे घुग्घुस हा गाव नेहमी चर्चेत असतो . नगर परिषद घुग्घुस ची स्थापना झाल्या बरोबर तहसिलदार द्वारा दिल्या गेल्या नोटिस मुळे पुन्हा चर्चे चा खूप मोठा विषय बनला आहे .
या विषयाला घेऊन आम आदमी पार्टी, घुग्घुस च्या कार्यकर्त्या ने गहन चिंता व्यक्त केली. शनिवार ला चंद्रपुर विधानसभा क्षेत्र चे आमदार किशोर जोर्गेवार आणि प्रशासक नगर परिषद कार्यालय, घुग्घुस एवं चंद्रपुर तालुका चे तहसिलदार निलेश गौंड ला निवेदन देण्यात आले की सर्व नागरिकांना घराचे पट्टे लवकरात लवकर करून द्यावे ही मागणी केली होती. सोबतच सोमवार 1 मार्च ला आम आदमी पार्टी, घुग्घुस आणि चंद्रपुर कार्यकर्त्या ने चंद्रपुर तालुका च्यां तहसिलदार निलेश गौंड यांना भेट देऊन गहन चिंता व्यक्त केली आणि नगर परिषद घुग्घुस चा वती ने प्रश्न निर्माण केला.
तहसीलदारांनी या विषया वर जास्त काही न बोलता ज्यांना नोटिस प्राप्त झाले आहे हे त्यांचा इच्छे अनुसार पैसे भरणे की नाही हे निर्भर करते असे म्हटले आहे. या नोटीस नियमा अनुसार जारी करण्यात आला असे सांगितले.या संदर्भात आम आदमी पार्टी ने प्रश्न निर्माण केला की फक्त अमराई वॉर्ड क्र ०१लाच नोटीस का .

या चर्चे मधे आम आदमी पार्टी चे जिल्ला अध्यक्ष सुनिल जी मुसळे, संतोष जी दोरखंडे, भीवराज जी सोनी, राजेश जी विराणी, अशोक जी आनंदे योगेश जी आपटे, मयुर जी राईकवार ,बबन जी कृष्णपल्लीवार, शंकर जी धुमाळे, प्रदीप जी बोबडे, साखरकर जी, प्रतिक जी विरानी, धकाते जी, सौ वंदना जी गवली, अमित जी बोरकर, प्रणयकुमार जी बंडी, अभिषेक जी सपडी व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.