टणु गावचे सुपुत्र पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांचा नागरी सत्कार संपन्न झाला.

टणु येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्य कर्त्यानी आपली कायमची परंपरा टिकवली

0
397

 

निरा नरसिंहपूर  दिनांक- 3 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

टणु तालुका इंदापूर येथे जाणता राजा युवा व ग्राम विकास प्रतिष्ठान टणु यांच्या सौजन्यने ,,तरुणांचे प्रेरणा स्थान तडफदार कर्तुत्व आदर्श व्यक्तिमत्व व गोर गरीबांचे कैवारी विक्रम गुलाबराव मोहिते यांची ठाणे शहर पोलीस निरीक्षक पदी नेमणूक झाल्याबद्दल जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष माजी ऊप सरपंच सोमनाथ मोहिते, माजी विद्यमान सरपंच अशोक बळते, आधार स्तंभ मारुती मोहीते, माजी चेअरमन अमृत मोहिते, राजु सर मोहिते,  व सर्वच पदाधिकारी यांच्या वतीने भव्यदिव्य सर्वांच्या उपस्थित  भरतरी नाथाच्या पावन भुमी मध्ये  नागरी सत्कार पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांचा झाला. सत्काराचा सन्मान स्वीकारत असताना पुढे विक्रम मोहिते म्हणाले की टणु गाव हे भरतरी नाथाची पुण्यनगरी असल्या मुळे माझी जन्मभूमी आहे तीच कर्मभूमी आहे. ज्या पावन भुमी मध्ये माझा जन्म झाला. त्याचा कधी विसर पढु देणार नाही ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांचे सहकार्य या मुळे पोलीस निरीक्षक पदी माझी नियुक्ती झाल्यामुळे याचा मला आनंद आहे. जाणता राजा व ग्राम विकास प्रतिष्ठानने मला आदराने छोटा भाऊ या नात्याने माझा मान सन्मान केल्याबद्दल मी कधीच विसर पढु देनार नाही. सत्कारा निमित्त पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी उपस्थित विनोद मोहिते, पांडुरंग मोहिते, गणेश मोहिते , सागर मोहिते, महावीर जगताप, नाथा चव्हाण, तानाजी मोहिते, कविराज मोहीते, हे सर्वच पदाधिकारी उपस्थित राहून नागरकी सत्कार केला.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160