भांबोरा ग्रा.पं.च्या सरपंच पदी कुणाल राठोड यांची निवड, तर उपसरपंच पदी जितेंद्र राठोड

0
46

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भांबोरा ग्राम पंचायतीचा समावेश होता. घाटंजी तालुक्यातील अत्यंत महत्वाची समजल्या जाणाऱ्या या ग्राम पंचायतीकडे तालुक्यासह अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यात एकता जन विकास आघाडी पॅनल व विरोधी गटामध्ये काट्याची लढत होती. एकता जन विकास आघाडीचे सर्वेसर्वा मार्गदर्शक अशोक कोठारी, रामसिंग राठोड, कवडू चव्हाण, सवाईराम राठोड संभुजी धुर्वे, आनंदराव उरकुडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली. यात मतदारांनी पारदर्शक कारभारासाठी उत्तम गावाचा विकास व्हावा या उद्देशातून या गटाला बहुमताचा कौल दिला. यात २२ फेब्रुवारी ला पार पडलेल्या सरपंच निवडीत सरपंच पदी उच्च शिक्षित तरुण कुणाल विनोद राठोड तर उपसरपंच पदी जितेंद्र दत्ता राठोड यांची बहुमताने निवड झाली.
भांबोरा गाव तालुक्यातील महत्वाचे समजल्या जात असून येथिल राजकारणावर सर्वच राजकीय पक्षांची नजर लागलेली असते. या गावात मुख्य पक्षाचे नेते मंडळी आहेत. मात्र यावेळेस मतदारांनी उच्च शिक्षित तरुणाई मंडळीच्या हातात सत्ता सोपवून केवळ नी केवळ गावाचा विकास ही अपेक्षा बाळगल्याचे पुढे आले आहे. आपल्यावर जो विश्वास टाकून मतदारांनी तरुणाईला संधी दिली या विश्वासाला तडा जाऊ न देता गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेवून गावाचा कायापालट घडवून आणू असे मनोदय नवनिर्वाचित सरपंच कुणाल राठोड व उपसरपंच जितेंद्र राठोड यांनी व्यक्त करीत मतदारांचे व पॅनल नेतृत्वाचे आभार मानले.