माझी कविता माझे विश्व,जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेत अर्चित चाफले प्रथम लालगुडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या प्रतिभेला जिल्हास्तरीय सन्मान

0
86

 

वणी : परशुराम पोटे

माझी कविता माझे विश्व या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन चिमुकल्या विध्यार्थ्यांकरिता नोव्हेबर महीन्यात करण्यात आले होते. त्यामध्ये इयत्ता १ ते ५ या गटातुन अर्चित शैला कैलास चाफले जि.प.प्रा. शाळा लालगुडा याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्चित वर्ग ४ थी चा विद्यार्थी असुन त्याच्या कवितेचे नाव आहे, “मामाच्या गावाला जाउया” यामध्ये त्यांने मामाच्या गावाला गेल्यानंतर काय काय प्रत्यक्ष अनुभवल याचा खुमासदार वर्णन केलेल आहे. अतिशय सुंदर कल्पकता व प्रतिभा या कवितेतून दिसून येते. या त्यांच्या यशाच श्रेय त्याचे आईवडील व त्यांच्या वर्गशिक्षीका श्रीमती वसुधा ढाकणे यांना देण्यात येत आहे. सर्वच स्तरातुन कौतुक होत असून,त्याच्या यशासाठी व पुढील वाटचालीसाठी जि.प.प्रा.शाळा लालगुडा समस्त शिक्षक वृंद यांच्याकडुन हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे वणीच्या न्याय व्यवस्थे मध्ये अर्पित चे वडील के.के.चाफले न्यायाधीश असून त्यांचा मुलगा हा मराठीतून शिक्षण घेत आहे, ही बाब सुध्दा समाजाला दिशा देणारी असुन शैक्षणिक क्षेत्रात भापकेबाजीकडे न जाता, मुलांचे करिअर हे मराठी शाळेतूनच घडू शकतो हा संदेश सुद्धा यातून मिळतो आहे.