शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा ५००० रुपये असलेली महिलेची पर्स केली परत

0
167

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोला शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असलेल्या शहर वाहतूक पोलीसानी आपल्या धडाकेबाज कारवाया सोबत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जनमानसात एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. शहर वाहतूक पोलीस शहरातील वेगवेगळ्या चौकात आपले कर्त्यव्य पार पाडीत असतात, ऊन, वारा, पाऊस ह्याची परवा न करता, अकोल्यातील बेशिस्त वाहतुकीला सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडीत असतांना बऱ्याच वेळेस जेष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे, रस्त्यावरील गरीब भुकेल्या गरिबाला अन्न देणे ह्या बरोबरच घाईगर्दी मध्ये एखाद्या नागरिकांचा हरविलेला मोबाईल, महत्वाचे कागदपत्रे, पाकीटे त्यांनी प्रामाणिक पणे परत केलेली आहेत.प्रसंगी संबधितांचा परिश्रम पूर्वक शोध घेऊन परत केली आहेत, असाच एक प्रसंग काल दिनांक १ मार्च रोजी स्थानिक टॉवर चौकात घडला, तेथे कर्त्यव्य बजावीत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अजहर शेख ह्यांना चौकात एक लेडीज पर्स पडलेली आढळून आली, ती उघडून बघितली असता त्या मध्ये अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जसे क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना अशी महत्वाची कागदपत्रे व ५००० रुपये रोख आढळून आले, त्यांनी कागदपत्रा वरून माहिती घेतली असता सदर लेडीज पर्स स्नेहल निकाते राहणार कोर्ट कॉलनी, मोठी उमरी अकोला असल्याचे निष्पन्न झाले, अजहर शेख हे शोध घेत असतानाच १५ ते २० मिनिटा नंतर एक महिला काही तरी शोधतांना दिसून आल्याने वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांनी त्यांचे कडे चौकशी केली.असता त्यांनी महत्वाचे कागदपत्रे व पैसे असलेली पर्स हरविल्याचे सांगितले त्या नंतर ओळख पटवून अजहर शेख ह्यांनी महत्वाची कागदपत्रे व जवळपास ५००० रुपये असलेली पर्स त्या महिलेला परत केली असता त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी अकोला पोलिसां प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली, शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्याचे प्रामाणिकपणा बद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके व शहर वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस अमलदारांनी त्यांचे अभिनंदन केले.