अनैतिक संबंधातून नागपुरात घडले दुहेरी हत्याकांड नको त्या अवस्थेत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिले.. व कुंवरलाल ने कुर्‍हाडी ने केले दोघांना ठार!

 

सुनील साळवे /आशिष भगवान थूल
दखल न्यूज भारत टीम नागपूर

अजनी / नागपूर :- दि.२७ जूलै २०२०
नागपुर शहरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कल्याणेश्वर नगर बेसा रोड नागपूर या परिसरात दिनांक २६ जुलै २०२० रोजी रात्री १:३० वाजताच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची क्रूर घटना घडली.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी कुंवरलाल भरत बरमय्या (वय ४५ वर्षे) राहणार ता. मोरगाव जि.बालाघाट मध्य प्रदेश येथील रहिवासी असून मृत व्यक्तींची नावे किरण कुंवरलाल बरमय्या (वय ३५ वर्षे )व तिचा प्रेमी शिवा(४०वर्ष) हा आहे.दोन वर्षांपूर्वी कुंवरलाल, त्याची पत्नी किरण सोबत मोलमजुरीचे काम करण्यासाठी नागपूरला आला. दोघेही सेंट्रिंगच्या कामाला जात असत.दरम्यान सोबत काम करणाऱ्या शिवा नामक व्यक्तीची कुंवरलाल याची पत्नी किरणसोबत ओळख व प्रेम संबंध जुळले. पती कुंवरलाल च्या पाठीमागे दोघेही अज्ञातस्थळी भेटून आपली हवस मिटवू लागले.
घटनेच्या दिवशी रात्री दीड वाजेच्या दरम्यान शिवा हा किरणच्या घरी आला. पती दारू पिऊन गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन दोघेही प्रेम क्रिडेत मग्न झाले. अचानक कुंवरलाल लघुशंकेला उठला व त्याला घरातून आवाज येऊ लागला. घराचे दार उघडून पाहताच किरण व शिवा दोघेही प्रेम क्रिडेत मग्न होते. कुंवरलालने दोघांनाही नको त्या अवस्थेत बघताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कुंवरलालने जवळच पडलेल्या कुऱ्हाडीने दोघांवरही सपासप वार केले आणि किरण व शिवाचा जीव घेतला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांनी मीडिया ला दिलेल्या माहितीनुसार कल्याणेश्वर येथे खुपच जोरजोरात भांडण सुरु असल्याची सुचना माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडे येताच त्यांनी अतितात्काळ घटनास्थळी आपले पोलीस कर्मचारी पाठवले असता तिथे गंभीर जखमी अवस्थेत किरण आणि शिवा आढळून आले. बाजुला हल्ला करणारा कुंवरलाल पण होता. त्यावेळी प्रत्यक्ष साक्षीदार यांनी दिलेल्या बयानानुसार हल्लेखोर हा कुंवरलाल च असुन त्यानेच कुर्‍हाडी ने हल्ला करुन दोघांना जखमी केले असे माहीत पडले. अजनी पोलिसांनी अतितात्काळ गंभीर जखमी अवस्थेतील किरण आणि तिचा प्रियकर शिवा ला मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना म्रृत घोषित केले. अजनी पोलिसांनी कलम ३०२ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी कुंवरलाल बरमैय्या यास अटक केली आहे.