अंतरगाव येथे कोरोना योद्धा म्हणून वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार

372

सावली ..सुधाकर दुधे
कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी योद्धा म्हणून काम केले अशा आरोग्य वर्धिनी केंद्र अंतरंगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. म्हस्के व केंद्रातील सर्व आशाचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्याचे माजी वित्त, नियोजन व वनमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य वर्धिनी केंद्र अंतरंगाव येथील कोरोना योद्धा म्हणून वैदयकिय अधिकारी डॉ. सुरज म्हस्के, पुनम झाडे, 28 आशा व राजु धोटे यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश पाल, डॉ. सुरज म्हस्के, डॉ. वासनिक, छाया चकबंडलवार, प्रतिभा बोबाटे, आशा गटप्रवर्तक रीना कोल्हे, वर्षा भांडेकर आदी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांनी केले यशस्वीतेसाठी जितेंद्र म्हस्के, राजु धोटे, तुळशीदास भुरसे, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.