राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसदिनी आरमोरी तालुका शिवसेनेच्या वृक्षारोणसह विविध कार्यक्रम संपन्न मजुरांना बिस्किट व प्लास्टिक कापड(मेनकापड) यांचे वाटप करताना पदाधिकारीसह समस्त शिवसैनिक.

178

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

आरमोरी तालुका शिवसेनेच्या वतीने भगत सिंह चौक आरमोरी येथे पावसाच्या दिवसातील आवश्यक गरज लक्षात घेऊन बांधावर धानपिकांची लागवड (रोवणी) करायला जाणाऱ्या स्त्री मजुरांना पावसाच्या पाण्यात अंग ओले होऊ नये म्हणून वापरात येत असलेले व ग्रामीण बोलीभाषेत त्याला आपण मेन कापड म्हणून उल्लेख असलेल्या प्लास्टिक कपड व बिस्किटचे वाटप करण्यात आले. तसेच श्री संजय शेंडे यांचे शेतावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा.डॉ. रामकृष्णजी मडावी जिल्हा सह संपर्कप्रमुख तथा माजी आमदार, श्री राजूभाऊ अंबानी आरमोरी विधानसभा संघटक, महेंद्र भाऊ शेंडे तालुका प्रमुख, श्रीमती हेमलताताई वाघाडे जिल्हा महिला संघटिका, वेणूताई ढवगाये माजी जि. प. सभापती, सौ. कल्पना ताई तिजारे जिल्हा महिला उपसंघटक, सौ. मेघाताई मने, श्रीमती वंदनाताई मस्के, सारिका कांबळे, संध्या भरणे, विजय मुर्वतकार उप तालुका प्रमुख, विनोदभाऊ बेहरे, विलासजी दाने, गणेश भाऊ तिजारे, दिलीप हांडगे OBC तालुका अध्यक्ष, ज्ञानेश्वरजी ढवगाये, पप्पू ठेंगरी, टिकाराम हेमके, लक्ष्मणजी सहारे, रेवनाथजी बोरकुटे, अविनाश लिंगायत, भाऊरावजी बोरकर, प्रदीपजी नन्नावरे संतोष चंदनखेडे, वैभव ठेंगरी, अरविंद डोकरे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.