मुल येथील राईस मिल मालक व ट्रॅव्हल्स मालक यांचे वर गुन्हा दाखल करा:-राजू झोडे

0
99

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420
मूल :- ओम राईसमिल मुल व साईकृपा राईसमिल मुल येथील मालकांनी बिहार येथील ६५ मजूरांना आपल्या राईस मिलमध्ये काम करण्यासाठी ट्रॅव्हल्स ने आणले. त्या सर्वच्या सर्व ६५ मजुरांना कोरोना संसर्गाची लागण झाली व सर्व पॉझिटिव्ह निघाले. या ६५ मजुरांपैकी अनेक मजूराकडे ई-पास देखील नसल्याची माहिती आहे. दोन ट्रॅव्हल्स मध्ये एवढे पासधारक मजुर आणणे शक्य नाही. तरीही राईस मिल मालक व ट्रॅव्हल्स मालकांनी एवढे मोठे मजूर आणून कोरोना संसर्ग पसरवल्या बाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाकडून ३० मजुरांना ओम साई मिल येथे आणण्यासाठी परवानगी दिली होती मात्र प्रत्यक्षात ६५ मजुरांना आणण्यात आले.यातील ३२ मजुरांना साईकृपा राईसमिल मध्ये गृह विलीनीकरण करण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. ज्या राईस मिलमध्ये मजूर आणण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती त्या राईस मिलमध्ये मजुरांना गृह विलगीकरण करण्यासाठी मालकाच्या सांगण्यावरून परवानगी कशी दिली?असा सवाल राजु झोडे यांनी प्रशासनाला केला.सर्व मजूरांना संस्थात्मक विलिनीकरण ठेवणे बंधनकारक होते मात्र स्थानिक राईस मिल मालकांनी या मजुरांचे गृह विलगीकरण करण्याची सुविधा असल्याचे सांगून मध्येच घेऊन गेले व त्यांच्याकडून काम करवून घेत होते.या मजुरांची स्वॅब तपासणी अहवाल येण्याचे आधीच बाहेर राज्यातील आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याचे प्रशासकीय नियम आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील मजुरांच्या विलगीकरणाचे सुविधा आहे किंवा नाही याची खातरजमा प्रशासनाने सुद्धा केली नाही. याबाबत प्रशासनही जबाबदार असल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर असून यामुळे मूल शहरात व आजूबाजूला कोरोना संसर्ग वाढण्याची मोठ्याप्रमाणात भीती आहे. ट्रॅव्हल्स मालकांनी सुद्धा बेकायदेशीररित्या नियमाचे उल्लंघन करून ६५ मजूर ट्रॅव्हल्स ने आणले हा फार गंभीर गुन्हा असूनसदर जबाबदार राईस मिल मालक व ट्रॅव्हल्स मालक यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उलगुलान संघटना द्वारा प्रशासनाकडे करण्यात आली.
जर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली नाही तर याबाबत उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार व याला जबाबदार संबंधित प्रशासन राहणार असा इशारा उलगुलान संघटनेच्या वतीने देण्यात आला. सदर मागणीचे निवेदन उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, शाखा मुल चे अध्यक्ष निखिल वाढई, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, मनोज जांभुळे ,प्रणित पाल, विनोद चिचघरे, आकाशी दहिवले यानी आदि कार्यकर्ता तहसिलदार मुल यान्या निवेदन देवून आंदोलन च इशारा दिल