जगविख्यात साहित्य सम्राट शिवशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना जन्म शताब्दी भारतरत्न पुरस्कार मिळण्याबाबत सकल मातंग समाजाचे तहसीलदार आकोट यांना निवेदन

129

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आकोट तालुक्यातील मुंडगाव येथील सकल मातंग समाजाचे तहसिलदार आकोट यांना दिनांक २७जुलै सोमवार ला दुपारी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात साहित्य सम्राट शिवशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे यांना जन्म शताब्दी वर्ष १ आॅगष्ट २०२० येत आहे. साहित्य ,समजा सुधारक आणि महाराष्ट्र चळवळ यात डाॅ. अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. मागासवर्गीय समाजातून पुढे आलेल्या डाॅ.अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाच्या वेथा वेदना आपल्या साहित्यातून जगा समोर मांडल्या त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार हरिष गृरव यांना देण्यात आले. यावेळी तुषार पाचकोर उपसरपंच प्रभू गवई, वस्ताद लहुजी ग्रूप अध्यक्ष सुरेश गवई अण्णाभाऊ साठे स्मारक समिती मुंडगांव अध्यक्ष ,सुधिर गवई (मार्गदर्शक), कीसन बागंर – विजय खंडारे , अमोल गवई ,राजु वाघमारे ,केशव गवई , विजय पवार ,श्रावण अवचार, प्रदीप गवई यांची उपस्थिती होती