प्रगटदिन महोत्सवानिमित्त गजानन विजय ग्रंथाचे पारायन

0
39

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

वरूर जऊळका संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त दि.१ मार्च पासुन योग योगेश्वर संस्थांन मध्ये गजानन विजय ग्रंथाचे पारायनाचे आयोजन करण्यात आले आहे. गजानन विजय ग्रंथाचे वाचक ह.भ‌.प.वैभव महाराज वसु याचे कडे आहे. सप्ताहा मध्ये सकाळी काकडा भजन,गजानन विजय ग्रंथाचे पारायन सायकाळी हरीपाठ ,हरिकिर्तन राहील सप्ताह मधे ह. भ. प.श्रीधर महाराज पातोंड, रवींद्र महाराज केंद्रे , अशोक महाराज राजगुरू,मंगेश महाराज ठाकरे व गणेश महाराज शेटे यांचे दि. 5 मार्चला काल्याचे किर्तन होणार आहे. कार्यक्रमामध्ये सोपान महाराज ऊकर्डे,विक्रम महाराज शेटे ,विलास महाराज कराड, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, प्रविण महाराज कुलट, अमोल महाराज कुलट ,श्रीधर महाराज तळोकार, गोपाल महाराज नारे, प्रसाद महाराज कुलट पुरुषोत्तम महाराज रौराळे, मोहन महाराज काळे, विष्णु महाराज आवारे संतोष महाराज घुगे ,विठ्ठल महाराज केंद्रे ही गायक-वादक मंडळी उपस्थित राहणार आहे. कोरोना विषाणू मुळे महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे परतु श्रींच्या दर्शनास येणाऱ्या भक्तास बुंदीचा प्रसाद देण्यात येईल कोरोना विषाणु चा वाढता प्रभाव पाहता शासनाने सागितलेल्या नियमाची संपुर्ण अमलबजावनी होनार असलयाचे गणेश महाराज शेटे यांनी सागीतले आहे. सदर कार्यक्रम रतन पाटील वानखडे यांच्या मार्गदर्शनात पार पडणार आहे.