मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शालेय साहित्याचे वितरण

122

 

प्रतिनिधी: बिंबिसार शहारे

तुमसर दि.२७/०७/२०२० :
महाराष्ट्र राज्याला लाभलेले सुसंस्कृत नेतृत्व, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुमसर शहरातील गांधीनगर येथील मृत्यू पावलेल्या सफाई कामगाराचा मुलींना शालेय शिक्षणाकरिता पाठ्यपुस्तके व शालेय साहित्याचे वितरण शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
शहरातील गांधीनगर येथील भगवान चौधरी हे २०१७ पासून तुमसर नगरपरिषद अंतर्गत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. परंतु कामावर असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. भगवान चौधरी यांच्या परिवारात दोन मुली, एक मुलगा असून तिघेही शिक्षण घेत आहेत. परिवाराची जबाबदारी पत्नी मंगला चौधरी यांच्यावर आहे. छोटेमोठे काम करून कुटुंबांचा संसार सुरू आहे.
सफाई कामगाराच्या कुटुंबाला मदत व्हावी, यादृष्टीने शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपून शालेय साहित्य भेट दिले. यावेळी शिवसेना मा. उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, मनोहर गायधने, वामनराव पडोळे, सतिश बन्सोड, तरुण लांजेवार, सौरभ पोटभरे उपस्थित होते.