Home कोकण सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱयांनी कोविड वॉर्डमध्ये जाऊन केली पाहणी

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱयांनी कोविड वॉर्डमध्ये जाऊन केली पाहणी

172

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

सिंधुदुर्ग :- जिल्हय़ाच्या जिल्हाधिकारी श्रीम. के.मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड -19 आयसोलेशन वॉर्डला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना बाधीत रुग्णांशी थेट संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. यामुळे कोरोना रुग्णांना देखील आधार वाटला त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना मिळणाऱ्या सोई सुविधांन बाबत सांगितले. यावेळी आय.एम.ए.चे डॉ. संजय केसरे, डब्लु.एच.ओ.चे कंन्स्लटंट डॉ. तेजपाल सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. नागेश पवार, डॉ. गावकर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी रुग्णांना मिळत असलेल्या सोयी व सुविधांविषयी विचारपूस केली. कोविड – 19 वॉर्डमध्ये मिळत असलेल्या औषधोपचारां विषयी रुग्णांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांनी आय.सी.यु. वॉर्डलाही भेट दिली. ॲडमिशन, डिस्चार्ज व इतर सर्व प्रक्रियांची माहिती घेतली. ऑक्सिजनचा होत असणारा पुरवठा, व्हेंटिलेटर, मॉनिटर यांचीही पाहणी केली. यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी कोविड – 19 वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Previous articleवातावरणातील बदलामुळे जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
Next articleमुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शालेय साहित्याचे वितरण