वातावरणातील बदलामुळे जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
पावसाची अनियमितता, वातावरणातील बदल, पाणीपुरवठा साधनांची देखभाल, दुरुस्तीचा अभाव यामुळे गडचिरोली जिल्ह्यात जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.कोरची तालुक्यातील आस्वलहुळकी येथे जलजन्य आजारामुळेच नागरीकांची प्रक्रुती खालावल्याचे निदर्शनास आले.
जिल्ह्यात ग्रामिण भागातील नागरिक पीण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने हातपंपावर अवलंबून आहेत मात्र हातपंपाची नियमित देखभाल व दुरूस्ती केली जात नाही काही गावात नळयोजना कार्यान्वित केली आहे परंतु जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने जनतेला नदितील गढूळ पाणी प्यावे लागत आहे. तसेच परीसरात डासांचा प्रादुर्भाव आढळून येतो यामुळे जलजन्य आजार डोके वर काढत असतो.
या संदर्भात गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता जलजन्य आजारामुळे जिल्ह्यातील 94 जन बाधीत झाले होते. डेंग्यू, हिवताप, गॅस्ट्रो, अतिसार,हगवन, गोवर, जेई आदि अशी 94 प्रकरने आढळून आली होती. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालात यावर्षी नमूद करण्यात आले आहे.
अशाच प्रकारची परीस्थिती यावर्षीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज आहे.