महात्मा गांधी महाविद्यालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ‘मी आय. ए. एस. होणारच’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

109

 

हर्ष साखरे तालुका प्रतिनिधि आरमोरी

आरमोरी:-
दि. २५जुलै २०२०
स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असणारी भीती दूर व्हावी, विद्यार्थ्याच्या मनात स्पर्धापरीक्षेविषयीचा
आत्मविश्वास बळावला जावा, अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धापरीक्षेला सामोरे जावे, त्यांना स्पर्धापरीक्षेविषयी यथोचित मार्गदर्शन मिळावे या हेतूने प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात
पहिल्यांदाच स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथील
आय,क्यु.ए.सी, आणि स्पर्धापरीक्षा विभाग आणि मिशन आय, ए. एस. यांच्या संयुक्त विद्यमाने व्हीडिओ
कॉन्फरसिंगद्वारे *मी आय. ए. एस. होणारच’* या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे चे आयोजन करण्यात आले
होते.
याप्रसंगी मिशन आय. ए. एस.
संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी मार्गदर्शन करताना मिशन
आय. ए. एस. ही संस्था फक्त एक रुपयामध्ये शालेय जीवनापासून आय.ए.एस. चे प्रशिक्षण देत असल्याचे
स्पष्ट केले. आतापर्यंत संस्थेशी दोनशे आय.ए.एस. व आय. पी. एस. अधिकारी जुळले असल्याचे सांगून या
सर्वांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना निःशुल्क प्राप्त होईल याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांनी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. कुठल्याही विपरित परिस्थितीचा बाऊ न करता मनाच्या परिपूर्ण
तयारीने स्पर्धापरीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरे जावे, असे त्यांनी स्पष्ट केले व स्पर्धापरीक्षेविषयी तयारी कशी करावी, स्पर्धापरीक्षेला उपयोगी पुस्तके आणि अभ्यास करण्याची पद्धती यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.
काठोळे सरांनी ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धापरीक्षेची कार्यशाळा महाराष्ट्रात महात्मा गांधी महाविद्यालयाने पहिल्याप्रथम आयोजित केली असल्याचे सांगितले व महाविद्यालयाचे अभिनंदन केले. यावेळी श्री. प्रवीण खांडवे यांनी मिशन आय. ए. एस. च्या माध्यमातून फाऊंडेशन कोर्स
ऑनलाईन पद्धतीने कसा करता येईल याविषयीची प्रक्रिया स्पष्ट केली. त्यांनी स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुपर ६० ची माहिती दिली व आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी प्रास्ताविक केले व आयोजनाची भूमिका विशद केली.
स्पर्धापरीक्षेविषयी ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्युनगंड न बाळगता स्पर्धापरीक्षेला
सामोरे जावे, असे स्पष्ट केले. या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये ७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. झुम अॅपवर १०० व्यक्ती जुळले तर युट्युब लाईवर या कार्यशाळेचे लाईव प्रसारण झाले यूट्यूब लाईवर १००० विद्यार्थी जुळले होते. ऑनलाईन कार्यशाळेचे संचालन प्रा. डॉ. विजय रैवतकर यांनी केले. आभार कार्यशाळेचे संयोजक
प्रा. नोमेश मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. प्रियदर्शन गणवीर, प्रा. डॉ. किशोर वासुर्के, प्रा.
सुनील चुटे, डॉ. विजय रैवतकर यांनी परिश्रम घेतले.