प्रदेशाध्यक्षपदी मनिष रक्षमवार

0
40

 

मुल (प्रतिनिधी)

मानव सेवा व गौ सेवा संस्थानच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा पदी मनिष रक्षमवार यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष बाल योगी जितेंद्र व्यास यांनी केली आहे.

बाल योगी जितेंद्र व्यास यांनी मानव सेवा व गौ सेवेसाठी स्थापन केलेली सर्व मान गौ सेवा संस्थान हरीगढ (उत्तर प्रदेश) येथे स्थापन केले असुन संपुर्ण देशामध्ये यांचे कार्य अविरत आहेत. मनिष रक्षमवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून संस्थापक अध्यक्ष बाल योगी यांनी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी श्री. मनिष रक्षमवार यांची नियुक्ती केले असुन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. श्री. मनिष रक्षमवार हे खबर महाराष्ट्राची न्युज चे मुख्य संपादक असुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका सरचिटणीस आहे. सामाजिक कार्याची आवड असणारे मनिष रक्षमवार हे अपघातामध्ये अनेकांना मदत करुन प्राण वाचविले असुन त्यांच्या या कार्याची दखल घेवून तत्कालीन पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांचा सत्कार केला होता. गरजुनां मदत करणे, अपघातात प्राण्यांचे प्राण वाचविणे, प्राण्यावरचं त्यांच प्रेम अविरत आहे. पुढील वाटचाली करीता त्यांना खुप खुप शुभेच्छा…..