ऑनलाईन बकरे खेरदी विक्री जिल्ह्यातील विविध ठिकाणी बकरे खेरदी विक्री करण्याची परवानगी द्या:- शिवबुध्दचे संदिप मुटकुळे

208

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी /// ऋषीकेश

महाराष्ट्र शासनाने मुंबई-पुणे मोठ्या शहरात ऑनलाईन बकरे खेरदी-विक्री करण्याची परवानगी दिली आहे परंतु सोलापूर जिल्हातील सर्व तालुक्यातील सारख्या छोट्या शहरात ऑनलाईन बकरे खेरदी विक्री शक्य नाही. कारण बकरी ईद निमित्त बकरे विकणारे व्यापारी,शेतकरी,यांच्याकडे स्मार्टफोन व ऑनलाईन विकीसाठी ऑपस नाहीत.तसेच बकरे खेरदी करणारे बकरा व्यवस्थित तंदुरुस्त आहे किंवा नाही हे सर्व पाहून खेरदी करतात त्यामुळे ऑनलाईन बकरा खरेदी विक्री सोलापूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यासह शक्य नाही.बकरी ईद करता अनेक शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून बकरे पाळून मोठे करून ठेवतात.तसेच सोलापूर शहरात व सर्व तालुक्यातील १,२,व ३ऑगस्ट रोजी बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. बकरी ईद साठी सोलापूर जिल्हात आणि तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात बकरे खेरदी विक्रीचा व्यवहार चालतो.दरवर्षी मंगळवार बाजार ,किडवाई चौक,होम मैदान,इक्बाल मैदान,चिराग अली मैदान,जय भवानी शाळा मैदान, पोलिस हेडकाॅटर समोरील मैदान रेल्वे काॅटर समोरील मैदान,काॅजल नगर तसेच ग्रामीण भागातील आठवडे बाजार सांगोला,मोडनिंब, कुडूवार्डी, टेंभुर्णी,अकुलूज,करमाळा,माढा,बार्शीमंगळवेढा,असे बकरी बाजार भरला जातो.आणि सोलापूर शहरातील वेगवेगळ्या भागात बकरे खेरदी विक्री केली जाते.त्यासाठी बकरे विकीसाठी त्यांना जागा उपलब्ध करून न दिल्यास शेतकरी व व्यापारी यांचे अतोनात नुससान होणार आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासह आणि शहरासह वेगवेगळ्या भागात सोशल डिस्टन्स व इतर सर्व नियम व अटीचे पालन करून जिल्ह्यातील व शहरातील विविध ठिकाणी बकरा खरेदी विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी निवेदनाव्दारे व मेलव्दारे आणि व्हटसापव्दारे सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे केली आहे.