नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली च्या वतिने कुरखेडा तालुक्यात नृत्य कलावंताची पहिली बैठक (आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानी डॉ परशुराम खुणे यांनी नृत्य कलावंतांनी मनातील न्युनगंड काढून टाकावे असे आव्हान नृत्य कलावंताने केले.)

0
42

 

कलावंतांनी आपल्या मध्ये असलेल्या कलेची कदर करून मनातील न्युनगंड बाजूला सारून कला सादर करावी व नृत्य सादर करतांना सादरीकरणाला विशेष असे महत्व द्यावे असे प्रतिपादन झाडीपट्टीतील जेष्ठ कलावंत डॉ परशुराम खुणे यांनी कुरखेडा येथे आयोजित नृत्य परिषदेच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शक करतानी केले.
यावेळी विषेश अतिथी म्हणून सिनेट सदस्य चांगदेव फाये,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अध्यक्ष नृत्य परिषद गडचिरोली प्रेरणा गारोदे, नृत्य परिषद विभाग प्रमुख डॉ प्रविण सहारे, आदिवासी साहित्यिक नंदकिशोर नैताम नृत्य शिक्षिका पुनम राठी हजर होते.
यावेळी डॉ प्रविण सहारे यांनी नृत्य परिषद संघटनेचे महत्व उपस्थित नृत्य कलावंना पटवून दिले तर प्रेरणा गारोदे ह्यांनी कुरखेडा तालुक्यात नृत्य कलेचे प्रशिक्षणासाठी आम्ही पुढाकार घेऊन ह्या परिषदेच्या माध्यमातून नृत्य कलावंताना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे विचार व्यक्त केले.
तर यावेळी सर्व कार्यकारी सदस्यांनी परिषदेचा हेतू आणि पुढील नियोजन याबाबद्दल सखोल माहिती दिली तर भाजयुमो चे जिल्हा अध्यक्ष तथा सिनेट सदस्य चांगदेव फाये यांनी नृत्यपरिषदेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व भविष्यातील उपक्रमांसाठी भक्कम पाठिंबा दर्शविला.त्याबद्दल नृत्य परिषदेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
तालुका स्तरीय युवक युवती महोत्सव २०२१ जिल्हा कार्यकारणी मंडळाच्या नियोजित नियोजनाखाली घेण्या करिता कुरखेडा नियोजन समितीची बैठक दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोज शनिवारी आयोजित केली आहे तरी सदर बैठकीत कुरखेडा तालुका नृत्यकर्मीनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
सभेचे सुत्रसंचलन प्राध्यापक विनोद नागपूरकर यांनी केले तर आभार चित्रकार लुकेश फुलबाधे ह्यांनी मानले.
सभेला तालुक्यातील नृत्य कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.