कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर
कन्हान(ता प्र) : – कोरोना आजाराचा संसर्ग झालेल्या युवा पत्रकार व त्याची आई उपचाराने दुरूस्त होऊन सुखरूप घरी पोहचल्याने कोरोना योध्दाचे पत्रकार संघ, कन्हान शहर विकास मंच व आपात्काळ सामाजिक संघटना व्दारे फुलाचा वर्षाव करित स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.
कन्हान येथील युवा पत्रकार ऋृषभ बावनकर व त्याची आई सरलाबाई बाव नकर (दि.१८) कोरोना पॉझीटिव्ह झा ल्याने दोघाना मेडीकल नागपुर येथे उप चार करून तिस-या दिवसी निगेटिव्ह आल्याने आमदार निवासात दाखल करण्यात आले होते. अवघ्या दहा दिवसात त्यांनी कोरोना आजाराच्या लढयात विज य मिळवित घरी सुखरूप आल्याने ग्रामिण पत्रकार संघ, कन्हान विकास मंच व आपात्काळ सामाजिक संघटना कन्हान व्दारे कोरोना योध्दा युवा पत्रकार व त्या च्या आईचे फुलाच्या वर्षावात व टाळया च्या गर्जरात स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाघ्यक्ष मोतीराम रहाटे, शांताराम जळते, रविंद्र दुपारे, रवी कोचे, रोहित मानवटकर, आपात्काळ सामाजिक संघटना कन्हान अध्यक्ष प्रमोद वानखेडे, विनोद कोहळे, पवन माने, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, संजय रंगारी, शुभम बावनकर,सोनु मसराम, प्रदीप बावणे, शारूख खान ,देवेंन्द बावनकर आदीने उपस्थित राहुन अभिनंदन केले.