नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला भुसुरुंग पोलिसांनी निकामी करत त्यांचा घातपाताची कट उधुळण लावला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे याचं कडून पोलीस जवानांचे कौतुक

146

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून २८ जुलै ते ३ ऑगस्ट रोजी नक्षल सप्ताह पुकारण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. दरम्यान
सोमवार (ता.27) नक्षलवाद्यांनी
पेरून ठेवलेला भुसुरुंग पोलिसांनी निकामी करत त्यांचा घातपाताचा कट उधळून लावला.
उपविभाग गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र रेगडी हद्दीतील मौजा रेगडी ते मौजा कोटमी रोडवर पोलिस मदत केंद्र रेगडीचे जवान रोड ओपनिंग करत असतांना नक्षलवाद्यांनी देशविघातक कृत्य व घातपाताच्या दृष्टीने भूसुरंग लावल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस मदत केंद्र रेगडी येथील प्रभारी अधिकारी यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क साधत या बाबीची माहिती दिली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथक गडचिरोली यांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्यंत सावधानता बाळगत नक्षलवाद्यांनी लावलेला सुमारे १० कि. ग्र. वजनाचा भूसुरुंग
निकामी करण्यात यश प्राप्त केले.
नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने हा भूसरुंग निकामी करण्यात यश मिळविल्याने नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळवून लावण्यात
पोलिस दल यशस्वी झाले आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस मदत केंद्र, रेगडी तसेच
बॉम्ब शोधक व नाशक पथक गडचिरोली येथील संपुर्ण टिमचे अभिनंदन करत त्यांना रोख
पारितोषिक जाहिर केले आहे.