Home यवतमाळ विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यलय वणी येथे विदर्भ...

विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यलय वणी येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ऍड, वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली वीजबिल होळी आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.

199

 

वणी : परशुराम पोटे

राज्य सरकारने प्रती युनीट केवळ अडीच रुपये विज निर्मीतीचा खर्च असतांना जनता व उद्योगांकडून तिप्पट – चौपट भावाने वसूलीचा हा गोरखधंदा बंद करावा.विदर्भातील कोळसा वापरुन आम्हाला प्रदुषणाचे दुष्परिणाम भोगायला लावणाऱ्या सरकारने तातडीने विदर्भातील सर्वाचे लॉकडाऊन काळातील वीज माफ करुन दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय घ्यावा या ज्वलंत मागणीबाबत सरकारने जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, असे प्रतिपादन माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी केले. वणी येथे वि.रा. आं.समितीच्या वतीने “वीज बिल जलाओ” आंदोलनात एड. वामनराव चटप बोलत होते.
वणी महावितरण कार्यलय येथे आज दिनांक 27 जुलै ला दुपारी 12 वाजता वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापुढे वीजबिल जाळून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. या आंदोलनात पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,देवराव धांडे,संजय चिंचोळकर,बाळासाहेब राजूरकर,रुद्रा कुचनकर,राहुल खारकर,आकाश सूर,राहुल खिरटकर,सृजन गौरकर,दशरथ पाटील,राजू पिंपळकर,बालाजी काकडे,नारायण काकडे,राहुल झट्टे,मंगेश रासेकर,प्रीतम मत्ते,मंगेश डोंगे,होमदेव कन्नके आनंदराव पांनघटे,उद्धव हेपट,अनिल चटप,पुरुषोत्तम निमकर,पुंडलिक पथाडे, खुशाल कामरे,अलका मेवाडे,सुष्मा मोडक,भाऊराव लखमापुरे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे, यापुढे दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, शेतीपंपाचे थकीत वीजबिल माफ करावे, वीज निर्मीतीच्या उत्पादन खर्चानुसार म्हणजे सध्याच्या निम्मे वीजबिल आकारणी करावी, लोडशेडींग संपवून पूर्ण दाबाची व पूर्ण वेळ वीज द्यावी, इत्यादी प्रमुख मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना पाठविण्यासाठी विद्यूत उपअभियंता वणी यांना देण्यात आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी वीज बिल माफ करण्यासह इतर मागण्यांविषयी जोरदार घोषणा दिल्या.

Previous articleमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मारेगाव येथे फेसशिल्ड चे वाटप तसेच शहरात आजपासून निर्जंतुकीकरण सप्ताह सुरू
Next articleविशेष लेख शेतकरी संघटना,राजकारण,आणि शेतकरी शेतकरी संघटनांना संघटित कसे करावे?