महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समिती द्वारे गाडगे महाराज यांची जयंती साजरी

0
21

 

वणी : परशुराम पोटे

स्वच्छतेचा संदेश देणारे वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समिती वणी च्या वतीने धोबी समाज मंदिरात जाऊन महाराजांच्या मूर्तीला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख व धोबी समाजाचे माजी अध्यक्ष राजुभाऊ तुराणकर,धोबी समाज अध्यक्ष कैलाश बोबडे, समितीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले, समितीचे संघटक कासार सागर मुने, समिती समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये, नगरसेवक व भाजपचे शहर सरचिटणीस राकेश बुग्गेवार,युवा नेते चैतन्य तुरविले व इतर सन्माननिय सदस्य हजर होते.