कोलगाव च्या सरपंचपदी अभीषा राजेन्द्र निमसटकर, उपसरपंचपदी प्रदीप वासाडे याची बिनविरोध निवड

0
17

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

मारेगाव तालुक्यातील कोलगांव ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडी पॅनलने बाजी मारली असून सरपंच पदी अभीषा राजेंद्र निमसटकर तर उपसरपंच पदी प्रदीप नानाजी वासाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोलगाव ग्रामपंचायत मध्ये ३ प्रभाग असून सदस्य पदाकरीता एकूण ९ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलला ९ पैकी ५ तर त्यांच्या सहयोगी पॅनल ला २ जागी विजय मिळाल्यामुळे महाविकास आघाडी पॅनलकडे ९ पैकी ७ असे स्पष्ट बहुमत मिळाल्याने महाविकास आघाडी पॅनलचेच सरपंच, उपसरपंच पदी निवड होणार हे निवडणूकीपुर्वीच स्पष्ट झाले होते. सोमवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सर्व ९ सदस्य हजर होते.सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला गटासाठी राखीव असल्याने अभिषा निमसटकर यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.तर उपसरपंच पदासाठी प्रदीप वासाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. ग्रां.पं.सदस्यामध्ये अश्विनी आवारी,रविता अवताडे, रविन्द्र आत्राम, गुरुदास घोटकर,जया जुनघरी,वर्षा निब्रड,नंदा खिरटकर आहे.विशेष म्हणजे ‍महाविकास आघाडी पॅनलने हि निवडणूक संजय पारखी व राजेंद्र निमसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली होती.त्यांना गावकऱ्यांनी चांगली साथ दिली.