क्लोराइड मेटल कंपनीकडून आदिवासी गरजू बांधवांना धान्य आणि मास्क वाटप

0
18

आळंदी : जगभर कोरोनाने थैमान घातले असताना हातावर कुटुंब असलेल्या आळंदी परिसरातील चर्‍होली खुर्द, मरकळ, धानोरे, याभागातील आदिवासी बांधवांची उपासमार होत आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता तसेच आळंदी नगरपालिकाच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांना एक हात मदतीचा म्हणून धान्य, मास्क, सॅनिटायजर चे वाटप केले आहे.आदिवासी भागातील मुख्यत्वे करून गरीब असलेल्या बांधवांना हे धान्य वाटप केले असल्याची माहिती क्लोराइड मेटल कंपनीचे अधिकारी राजीव दत्ता यांनी दिली आहे आणि खऱ्या अर्थाने गरजू व गरीब आदिवासी बांधवांना गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार नसल्यामुळे त्यांना घरातच बसण्याची वेळ आली आहे त्यामुळे त्यांना रोजगारदेखील उपलब्ध होत नाही. दोन वेळचे जेवण आपल्या रोजगारावर अवलंबून असलेल्या या आदिवासी बांधवांसाठी धान्य वाटप करून त्यांचा किमान एक महिन्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याप्रसंगी क्लोराइड मेटल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव दत्ता, बळवंत कुलकर्णी, संजय मोकाशी, विठ्ठल मुकनवार, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम वहीले, उत्तम गोगावले, नगरसेविका प्रतिमा गोगावले, सरपंच कल्याणी ठाकूर, कालुराम थोरवे, विनायक ठाकुर, रवींद्र थोरवे, आशिष गोगावले, उमेश ठाकुर, हनुमंत थोरवे, सागर लोखंडे, चेतन लोखंडे उपस्थित होते.