घर जळालेल्या आदिवासी वृद्ध महिलेस नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्थे तर्फे आर्थिक मदत

0
92

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

घुगुस अमराई वॉर्ड न 1 येथील जेष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्ती भागरताबाई भीमराव सिडाम यांच्या घराला 9 फेब्रुवारी ला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील जवळपास 10 हजार रुपये, घराचे फाटे, अनाज, कपडे व इतर साहित्य आगीत जळल्याने भागरतताबाई यांचे घराचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या आदिवासी महिले ची ही दैनावस्था पाहूूून नव एकता जय सेवा बहुद्देशीय संस्था चांदागड घुगुस या संस्थेमार्फत आर्थिक सहयोग राशी व कपडे तसेच जेष्ठ आदिवासी समाज सेवक देविदास किवे यांच्या मार्फत धान्य व किराणा व तिरुमाल बालकिशनजी कुळसंगे यांच्या तर्फे 30 किलो तांदूळ देण्यात आले. या सेवा कार्यासाठी उपस्थित संस्थेतील सगा समाज बांधव ,मनीष आत्राम, गणेश कींनाके, दीपक पेंदोर, अंकूश उईके, शैलेंद्र सलामे , लतीश आत्राम ,मनोज चांदेकर ,अरविंद किवे, संदिप तोंडासे, तिरुमाय सुनीता आत्राम ,विद्याताई आत्राम इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.